मोबाइलवर व्यस्त,
मोबाइलवर व्यस्त,
सारेच घरात तरी घर कसे शांत,
कारण असे सारेच दिसे हे निवांत
पाहून मोबाइलमध्ये हसतात सारे,
चाललेत विसरुन हे जीवन खरे
नसे येथे कोणाचा कोणाला आदेश,
शेजारी बसून देती खुशालीचे संदेश
प्रत्यक्षात सगळे मोबाइलवर व्यस्त,
संभाषणा विनाच येथे जेवण फस्त
