नवरोबाचा शिरा
नवरोबाचा शिरा
1 min
23.2K
काल रात्री वेगळंच घडल
गुळ घालून रवा खाऊ वाटला
बायको माझी गालात हसली
गुळाची ढेप लपवून ठेवली
मी पण जरा हट्टाला पेटलो
पिठीसाखर पाहून खुदकन हसलो
गावरान तूप घालून रवा घेतला भाजून
सुंदर सुवास घरभर पसरला
वाटीभर साखर घालून रवा केला
काजू बदामने वरून सजवला
बाईसाहेबांना न देता एकटाच घेऊन बसलो
पहिल्याच घासात तोंड फिरवून बसलो
पिठी साखर नाही ती मिठाची बरणी होती
तिरक्या नजरेने पाहत बायको माझी हसत होती
माझी मात्र चांगली फजिती झाली होती
बायकोने मला चांगली अद्दल घडवली होती
