STORYMIRROR

Raju Padekar

Others

3  

Raju Padekar

Others

व्य था शेतकऱ्याची

व्य था शेतकऱ्याची

1 min
11.7K

१) नशिबी माझ्या गरिबी कशी आली रे देवा

कोणती पापे माझ्या कर्माला मिळाली

या कर्जापायी लेका नाही उमेदीची आशा

माझ्या कष्टाची फळ आता मला मिळावी


२) सुखी समाधानी व्हावे गाव माझे

माझ्या घामाची फुले मी माझ्या शेतात वाही

मी पोशिंदा आहे साऱ्या जगाचा

का मग माझ्या जीवाची अशी लाहीलाही


३) डगमगनार नाही मी कधीही

माझ्या हक्कासाठी मी लढणार

तुम्ही कितीही लढवा युक्ती

मी मात्र कधीही नाही हरणार


४) काळया आईचा मी सेवेकरी

तरी भाव नाही माझ्या कष्टापरी

काळाने ही फिरवली अशी पाठ

मी आहे या देशाचा मानकरी


५) आता कशी सांगू मी माझ्या व्यथा

पेरल तर उगवत नाही उगवल तर खपत नाही

अशा आपल्या कृषी देशात

माझी व्यथा कधी समजणार नाही


Rate this content
Log in