STORYMIRROR

Raju Padekar

Romance Others

3  

Raju Padekar

Romance Others

माझी तू होशील का?

माझी तू होशील का?

1 min
221

प्रेम करतो तुझ्यावर प्रिये

     साथ मजला देशील का?

आयुष्याच्या वाटेवर तू 

    हात हाती घेशील का?... !!१!!


प्रीत आपुली जगा वेगळी

     सोबत माझ्या राहशील का?

मम काळजातील हाकेला

    साद प्रेमाची देशील का?.. !!२!!


माझे सर्व काही तुझे आहे

      तू सर्वस्व मज मानशील का?

दिली आयुष्याची दोरी तुझ्या हाती

     हे निर्मळ नाते अखंड जपशील का ?.. !!३!!


माझ्या हृदयी वास्तव्य तुझेच

     मनात तुझ्या मज जपशील का ?

सांग,अंतरीच्या भावना जाणून 

    प्रिये, माझी तू होशील का ?.. !!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance