बुधवार...!
बुधवार...!
बुधवार बुदु बुदु सुख देणारा असू दे ....!!!
बु रखा सुखाचा घालून
ध गधगती सल मनात घेऊन
वा जवी पेक्षा जास्त कष्ट करून
र मत गमत दिवस सारले...
बु डत्याला काडीचा आधार
दु धावरची तहान ताकावर भागवत
बु जगावण्याचं जीणं
दू रचा पल्ला गाठण्याच्या ध्येयाने जगलो...
सु खा सुखी संसार सागरात डुबकी मारली
ख र म्हणजे गटांगळ्याही खाल्ल्या
देणा ऱ्यान भरघोस दिलं
रा न सुखाच, समृद्धीच छान पिकलं...
अ नायसे सार काही मिळालं
सु जलाम सुफलाम जीवन झालं पण
दे णाऱ्यान समाधान मात्र राखून ठेवलं
आता त्याच्यासाठीच
ही सारी धडपड....!!!