प्रेमाचं फूल
प्रेमाचं फूल
मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं?
मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये
तुझ्याकडून गिफ्ट आलेलं
पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं
फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा
नंतर कळलं तुझं लग्न आणि तुला झालेली मुलं
हादरून गेलो उभाआडवा, काहीच सुचलं नाही
लक्षच लागत नव्हते माझे, सारखा स्क्रिनवर बघत राही
त्या एका गिफ्टने बदलवून टाकले पूर्ण जीवन माझे
समजत होतो मीच स्वतःला प्रेमनगरीचे राजे
सत्य समजता डोळ्यावरची पापणीही लवत नव्हती
राजेशाही कोलमडून पार झोप उडाली होती&
nbsp;
इनबॉक्समध्ये तुझ्यातर्फे फक्त एकच गिफ्ट होती
ती ही मजला जड होऊन आता नकोशी वाटत होती
बुद्धू ती की मीच खुळा
याचा हिशेब जुळत नव्हता
केव्हा कधी नि कुठं घडलं हे
याचा शोधत होतो पत्ता
सेंट करावं दुसरी अशी कुणी भेटतही नव्हती
शोधून शोधून थकलो साऱ्या, सर तिची नव्हती
पहिलं प्रेम फुलासंगे जुळता जुळता राहिलं
पानिपत झाल्यानंतर तिला कायमच ट्रॅश केलं
सुरु झालं त्या मेलमध्ये आणि तिथेच सारं संपलं
झोपेची झेड आणि स्वप्नांचं ओझं देऊन बाजूला झालं