ममता आईची ( सहाक्षरी )
ममता आईची ( सहाक्षरी )


ममता आईची
दिसे रस्त्यावरी
बाळ चाले पायी
कुत्रं खांदयावरी ..... १
भूतदया असो
तोल सांभाळावा
लेकराचा हक्क
ना तो डावलावा.....२
मोबाईल पायी
ममत्व लोपले
पोटच्या गोळ्याला
रस्ती झोपवले......३
एक पाय वर
तोल सांभाळत
बोट स्क्रिनवर
संदेश पाहत....४
जनावरे बाळ
छातीशी धरती
माणूस वाहतो
नुसते ओझे ती....५