विनोदी संवाद
विनोदी संवाद


*बायको*
बाजूला मी असून सुद्धा
ह्याच लक्ष सतत बाहेर,
इकडे तरी आवर घाल नजरेला
हे आहे माझे माहेर.
*नवरा*
माहेरी जायचं म्हटलं की
करते तयारी पटपट,
घरी चल म्हटलं की
नेहमीच हिची कटकट.
*बायको*
तो केसात गजरा माळतो
तेव्हा मी जाते बावरून,
तेवढ्यातच म्हणतो कसा एक गजरा
मैत्रिणी ला यतेसे का देऊन.
*नवरा*
येता जाता माझ्याकडे
संशयाने बघत असते,
पाणी तर आणून देत नाही
मोबाईल पहिला चेक करते.
*बायको*
पाऊस सुरू असतानाही
छत्री विसरून घरी येतो,
भिजायचं मूड होता
अस खोटं कारण सांगतो.
*नवरा*
दिवाळी असो वा दसरा
माझ्या
कडून घेते काम करून,
जाऊन बसते सोफ्यावर
आणि म्हणते चहा देतोस का करून.
*बायको*
केलेल्या कामच त्याला
कधीच कौतुक नसतं,
घरीच तर असतेस
दुसरं काम काय असतं.
*नवरा*
जेवणाच्या ताटात असतोच
हीच लांब सडक केस,
शर्ट चा डाग तर जात नाही
काढते भरपूर फेस.
*नवरा*
खूपच बोललो आज
आता काही खरं नाही,
बायको माझी गुणांची
तिच्या इतकं प्रेमळ कुणीच नाही.
*बायको*
आता ह्या पुढे मी
काहीच बोलणार नाही,
दिली नवऱ्या तुला एक
संधी मी आता लिहिणार नाही.
*नवरा*
तू असलीस कवियत्री
तर मी ही तुझाच कवी,
हसत हसत वाचूया
आपण लिहिलेल्या ओळी