अनुभवलेला कोरोना
अनुभवलेला कोरोना
मेसेज आला व्हॉट्सअँप वर
शाळा उद्यापासून बंद
हळूहळू सर्वच कामे
होऊ लागली मंद....१
सुट्टी पडल्याचा तेव्हा
झाला खूप आनंद
आम्हा लहान मुलांना
खेळायचा जडला छंद....२
फळभाज्या पालेभाज्याचं
आई बनवायची सूप
लॉकडाऊन रेसिपी खाऊन
वाढली आमची भूक....३
थाळ्या आणि टाळ्या
वाजल्या संपूर्ण जगभर
असंख्य दिवे पेटवले
सर्वांनी तेव्हा घरभर....४
ऑनलाइन लेक्चर ला
व्हायची टाळाटाळ
आज ही आठवतो
कोरोनाचा कर्दन काळ....५
कोरोना हे नाव ऐकून
भीती खूप वाटली
जवळच्या माणसांची
आठवण मनात दाटली....६
क्वांरंटाईन असतानाचे
वाईट गेले हो दिवस
कोरोनामुक्त व्हावे म्हणून
आजीने केला नवस....७
जीवाची नाही केली पर्वा
डॉक्टर वर्ग सेवेत दिनरात
सफाई कामगार पोलिसांनी
केली कोरोना संकटावर मात....८
खरंच कंटाळा आला होता
एकाच जागी त्या थांबून
येता जाता ओळखीच्यांना
नमस्कार केला लांबून....९
येई शाळेची आठवण
पण हरवले सर्व मित्र
बातमीदारांनी मोठं केलं
कोरोनाचे भयानक चित्र....१०
स्वच्छतेचे नियम सर्व
आले आम्हाला कळून
कोरोनाला निरोप देताना
नाही पाहिले मागे वळून....११
भरकटलेल्या वाटेवर
परिस्थिती होती गंभीर
कोरोनाचा अनुभव घेऊन
मनाने झालो आम्ही खंबीर....१२
