STORYMIRROR

सानिका कदम

Romance

3  

सानिका कदम

Romance

आजच्या या पावसात...

आजच्या या पावसात...

1 min
402

आजच्या या पावसात

खरंच तुला भेटावस वाटतं,

तुला सोबत घेऊन

चिंब-चिंब भिजावस वाटतं.


तुला हसताना पाहून

तुझ्याकडे बघत रहावस वाटतं

तुझा हात हातात घेऊन

हिरव्यागार रानात फिरावसं वाटत


तुझ्या माझ्या भेटीच

गीत रचावेस वाटतं

तुझ्या सोबत गाण्यातं

स्वतःला हरवून जावं वाटतं


काळोख करून दाटून आलेल्या पावसात

तुझ्या मिठीत झुलावस वाटत

डोळे बंद करून तिथेच

थांबावस वाटतं....


तुझ्यासोबत रमलेल्या या

क्षणांला जपून ठेवावस वाटतं...

उघडया डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांत 

पुन्हा एकदा जगावस वाटतं.....

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance