प्रेमाचा पाऊस.......
प्रेमाचा पाऊस.......
न्हाऊन निघाले मी
प्रेमाच्या पावसात रे
गीत तुझे गात होते
येणाऱ्या दिवसांत रे
तुझ्या नावाची मेहंदी
हातावर माझ्या रंगते रे
तुला आठवत खुलून येई
माझ्या गालावरची खळी रे
थेंबा थेंबात पाहता तुला
दवबिंदू ही ओघळती रे
तुझ्या एका भेटीसाठी
मन माझे आतुर होते रे
रातराणीच्या सुगंधात
चांदण्यांना पांघरते रे
अलगत पापण्या मिटताच
तूच स्वप्नांत येतोस रे

