सूर राहिले....!
सूर राहिले....!
सांजवेळ होता होता
तुझी साद ऐकू येते
आठवणींच्या हिंदोळयावर
गीत तुझे गात असते
आजही क्षितिजावर
सूर्य रेंगाळताना दिसतो
तुझे गीत ऐकण्यासाठी
पाखरांचा थवा ही झेपावतो
आजही चंद्रासहित तारकां
अंबरात नटतातं
तू येशील म्हणुनी
रातराणीही रात्रीला सुगंधात बुडवितात
शब्द माझे नेहमीच
तुझ्याभोवती नाचले
गीत संपले तरी
सुर मात्र राहिलि

