STORYMIRROR

Haresh Magar

Romance

3  

Haresh Magar

Romance

चिंब झालो भिजूनी पावसात

चिंब झालो भिजूनी पावसात

1 min
242

फिरतो होतो असाच तुझ्या विचारात

दाटुनी ढग आले अचानक या नभात

आल्या अंगावर सरी जरी अकस्मात 

चिंब झालो भिजूनी पहिल्या पावसात...!


हवी होती आज मला तुझी सोबत

भिजण्या तुझ्यासवे पहिल्या पावसात

कोसळणाऱ्या पावसाखाली धरुन हातात हात

चिंब झालो असतो भिजूनी पहिल्या पावसात...!


तुझ्यासवे हिरवागार निसर्ग न्याहाळत

इंद्रधनु ला जणू डोळ्यात साठवत

सुनसान रस्त्यावर हवा तुझ्या हाती हात

चिंब झालो असतो भिजूनी पहिल्या पावसात...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance