Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

साथ प्रेमाची दे गं....

साथ प्रेमाची दे गं....

1 min
264


वेदना माझ्या मनाच्या

सखे तू जाणून घे गं ।

तोडू नको हृदय माझा

मला साथ प्रेमाची दे गं ।।धृ।।

टाकलेच आहे मोहजाळ्यात मला तर

कैद कर तुझ्या हृदयात ।

वेड लावून प्रीतीचे अशी तू

सोडून जाऊ नको भर रस्त्यात ।

धावत सखे साजने

तू मिठीत माझ्या ये गं ।

तोडू नको हृदय माझा

मला साथ प्रेमाची दे गं ।।१।।

धुंद केले ज्वानीने तुझ्या

आहे तू रूपाची खरी राणी ।

पाहून तुझ्या कांतीला

चकित होतात सारे मानव प्राणी ।

सर्वत्र फक्त तुझा चेहरा

पाहती नयन माझे हे गं ।

तोडू नको हृदय माझा

मला साथ प्रेमाची दे गं ।।२।।

तडपवू नको तू माझ्या हृदयाला

ये तू सारे बंधने तोडून ।

संसार थाटूया दोघेही

ईश्वराला साक्षी मानून ।

साहले मी विरह खूप

झाले आता पुरे गं ।

तोडू नको हृदय माझा

मला साथ प्रेमाची दे गं ।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance