खुलले सौंदर्य माझे
खुलले सौंदर्य माझे
खुललेय सौंदर्य माझे
अजुनही यौवनात मी
टपलीत पाखरे सारी
मिळण्या संधी नामी
साज रत्नांचा लेऊनी
केला हा सोळा शृंगार
शुभमंगल अशा दिनी
नेसले शालू हिरवागार
बांधलेस सौभाग्यसुत्र
सप्तपदींच्या वेदीवर
ठेवशील सुखी संसारी
दिलीस वचने मणभर
भाग्यवानच मी जगती
पाळली तू बंधने सारी
बहाल करून राज्ञीपद
खुश ठेवते मला स्वारी
जडताच प्रीत तुजवरी
उमगले अहोभाग्य मला
होताच मुलायम स्पर्श
चेतविले रे सख्या तुला
झुलवितोस रोज मला
प्रीतीच्या हिंदोळ्यावर
ऐकू हृदयाची स्पंदने
होती भावना अनावर