वसुंधरा
वसुंधरा


तापलीय वसुंधरा
मानवाच्या करणीने
जागतिक तापमान
उंचावले धरणीने
हो जागा आता मानवा
कर यावर जालीम उपाय
झाडे वृक्ष लावण्याचा
साधाच तर आहे पर्याय
करपून गेली सजीवसृष्टी
पाण्याशिवाय तहानेने
गुरेढोरे न् पशुपक्षी
व्याकुळ झालेत गरमीने
थंडगार वाहू दे वारा
पक्षी गाऊ दे वृक्षांवरी
पांथस्थ टेके गारव्याला
झाडे तरुंच्या बुंध्यावरी
बळीराजा हवालदिल
पाहूनी वाट वरुणाची
भुई शेते भेगाळलीत
वाहीना धार पावसाची
चीज होऊ दे बळीचे
त्याच्या अंगमेहनतीचे
मानवा कर वृक्षारोपण
स्वप्न सजल भूमातेचे
चातक बघ पाहतोय
वाट पावसाच्या धारेची
तृप्त कर तृष्णा त्याची
बरसात होऊ दे पर्जन्याची
होऊ दे विकास देशाचा
सुजलाम सुफलाम भारत
स्वप्न पाहतेय ही जनता
पर्जन्यवृष्टी येऊ दे परत