राहू दे अशीच प्रीत
राहू दे अशीच प्रीत


सखी राहू दे अशीच प्रीत
मिळाला प्रेमळ तुझा संग
उपभोग जीवनाचा घेऊ
झालो मी तुझ्यातच दंग
युगायुगांचे नाते आपले
जडली तुझ्यावरती प्रीत
जोडलीय साथ तुझ्याशी
तोडली समाजाची रीत
पट्टराणी तूच या जीवाची
हृदयाच्या कप्प्यात स्थान
जपतो जीवापाड तुजला
तू माझ्या जीवनाची शान
तुझ्या सुखासाठीच जीव
माझा टाकला मी गहाण
जपले जिवापाड तुजला
ठेव सखी तू त्याची जाण
प्रीतीच पाखरू तू माझं
घातली मोहिनी हळूवार
प्रीतीच्या बंधनात बांध
नाते प्रेमाचे तू अलवार
नको जाऊ सोडून मला
देऊनी विरहाच्या वेदना
तुझ्या प्रीतीत गुंतलो मी
जागल्यात अशा संवेदना