सल अंतरीची
सल अंतरीची

1 min

289
नको जपू मनी सखी
सल तुझ्या अंतरीची
दाबुनी या भावनांना
नसावी वेदना उरीची
झाले गेले विसरू या
जगूया नव्याने जीवन
फुंकर घालीन मनावर
मिळे जगण्या संजीवन
नको विरहवेदना ही
राहू एकजुटीनेच सारे
प्रेम देऊ आणि घेऊया
फिरू दे चैतन्याचे वारे
नकोच गं करू मनाची
अशी कधीच घालमेल
सांग माझ्या कानी गुज
लावू आयुष्याचा मेळ
सप्तपदींच्या वेदींवरी
वचन दिलेले मी तुला
नाही पडला विसरही
जपतो तुज प्रीतफुला