जोडी लक्ष्मीनारायणाची
जोडी लक्ष्मीनारायणाची

1 min

310
जशी रामजानकीची
अयोध्येत शोभे जोडी
सावंताच्या प्रांगणात
सुनामुलाची ही गोडी
सुंदर प्रेमळ युगूलाचा
परिवारही सांस्कृतिक
झळकावेच दोघांचेही
क्षात्रतेज साहित्यिक
व्हाव्या पूर्ण आकांक्षा
दोघांच्याही आयुष्यात
नवचैतन्यही जागवावे
फलद्रुप हो भविष्यात
जोडी ही सुनामुलाची
सदाचारी अन् सद्गुणी
सहकार्याचा हात पुढेच
जर मागता मदत कुणी
लाभावे आयुष्य त्यांना
संपन्न नि भरभराटीचे
नको जीवनात दु:खही
चालत्या जगरहाटीचे