गंध केशरी
गंध केशरी
दरवळ गंध केशरी
आपल्याच घामाचा
पिकविलाय दोघांनी
मळा सोनेरी श्रमाचा
साथ तुझी मिळताच
आलेय मला बघ बळ
पिकलेय शेतात मोती
होईल पैशाची चंगळ
साथ संसारात तुझीच
हाती नित्य तुझा हात
करूया मिळूनी दोघे
संकटावर अशी मात
थेंबे थेंबे धनाची करू
तिजोरीतुनी साठवण
नाही जात वाया कष्ट
करू या नित्य स्मरण
जन्मोजन्मीच्या सखी
बांधल्या स्वर्गात गाठी
नको विसरूस तू मला
आली जरी हाती काठी