जगुन घ्यावे कुशीत धरणीच्या
जगुन घ्यावे कुशीत धरणीच्या


जगून घ्यावे कुशीत धरणीच्या
फुलली फळांफुलांनी वसुंधरा
किलबिल करती पाखरे नभात
सृष्टीचा रम्य देखावा पहा जरा
बळीराजाही सुखावलाय आता
पडलीय खळ्यात धान्याची रास
कष्ट मेहनतीनेच बळीराजालाही
लागलाय नवनाविन्याचा ध्यास
मानवाने चालवलीय कुऱ्हाड
केलाय हा पर्यावरणाचा ऱ्हास
करावी लागवड आता वृक्षांची
मिळण्यास सुखाचाच हा श्वास
आकाशीच्या मंडपात इंद्रधनुचे
पहा सजलेय सप्तरंगांचे तोरण
नजारा सारा सृष्टीचा पाहताना
ठेवू पर्यावरणसंतुलनाचे धोरण
प्रसन्न झालेत आता वरुणराज
दिले मुबलक असे आम्हां जळ
नको उधळमाधळ करू मानवा
सोडून उगाचच पाण्याचा नळ