माझी शाळा
माझी शाळा


चल मित्रा शाळेला जायचं रे
लई,लई शिकायला मिळतय रे
छडीच शिक्षण गेलेय रे
ममता, समतेचे शिक्षण आलय रे
वाचायला, लिहायला मिळतय रे
लई, लई,समजू लागलय रे
लई, लई खेळायला मिळतय रे
लई, लई नाचायला मिळतय रे
एक, एक बनवायला मिळतय रे
लई, लई मज्जा येतेय रे
चल मित्रा शाळेला जायचं रे, लई, लई शिकायला मिळतय रे
बाई सर छान, छान
आम्हा आहे त्यांचा अभिमान
नाचून, डोलून आम्ही शिकतोय
नवीन गाणी आम्ही गातोय
चल मित्रा शाळेला जायचं रे लई लई शिकायला मिळतय रे
शिक्षण नवीन आलय रे
कृती युक्त सारे झालय रे
एक, एक प्रयोग होतोय रे
वाचायचे नक्की ठरलय रे
चल मित्रा शाळेला जायचंय रे, लई लई शिकायला मिळतय रे