हिंमतीनं जगायला शिक
हिंमतीनं जगायला शिक


शेतकरी राजा आता तरी विचार कर
आत्महत्यावर मात तू कर
इतके शेतबंधू गेले तू आता तरी जगायला शिक
संकटावर मात करायला शिक .
हिंमतीनं जगायला शिक
आत्महत्यावर मात करायला शिक
उघडं कपाळ घेऊन कारभारीनी
कष्ट करील रानोरानी
पोरबाळ हिंडतील पैशासाठी
त्या केविलवाण्या जीवासाठी
हिंमतीनं जगायला शिक
आत्महत्यावर मात करायला शिक
जीव लाविले ज्या घराला
त्याला नको उघडयावर सोडायला
काळया आईची आण तुला
लेकरा बाळाची आण तुला
हिंमतीनं जगायला शिक
आत्महत्यावर मात करायला शिक
कारभारीनीच्या कुंकूवाची आण तुला
जन्मदात्या आई बापाची आण तुला
आत्महत्या नसे पर्याय संकटावर
संकटावर मात तू कर
संकटावर मात करायला शिक
आता तरी हिंमतीने जगायला शिक .