STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

वाढदिवसाच्या दिनी.....

वाढदिवसाच्या दिनी.....

1 min
437

वाढदिवसाच्या दिनी

रूप तुझे खुललेले ।

प्रीतीमध्ये मन माझे

तुजकडे वेधलेले ।।

लाभो सौख्य नित्य तुला

मुखी हास्य तुझ्या खुले ।

बघुनिया रूप तुझे

बहरूनी उठे फुले ।।

यशोगाथा लिहिताना

कमी पडावी लेखणी ।

कांतीमध्ये तेज तुझ्या

तूच सर्वात देखणी ।।

आज शुभेच्छा शतदा

काय-वाचा-मने देतो ।

सुख देतो माझे तुला

तुझे दुःख सारे घेतो ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance