जगतोय तुझ्या आठवणीत.....
जगतोय तुझ्या आठवणीत.....
जमलेच नाही बेरीज,वजाबाकी मला
अधुरे राहिले प्रेमाचे हे गणित ।
सोडून गेली जेव्हापासून सखे तू
फक्त जगतोय मी तुझ्या आठवणीत ।।
किती प्रेम करतो मी तुझ्यावर
कधी मला कळलेच नाही ।
देतच गेलो मी तुला माझे प्रेम
आता अंतरी काही उरलेच नाही ।।
शक्यच नाही सखे गं आता
या मनाला अन्य कोणी भावेल ।
कोणाच्या प्रेमापायी नयन हे
आता कधी नाही गं जागेल ।।
होते तुझ्यावर प्रेम माझे
आजही आहे तुझ्यावर ।
करूच शकणार नाही कोणी
ताबा माझ्या मनावर ।।
मिळो सुख-समृद्धी तुला
जाशील सखे तू गं जिथे ।
एक थेंबही अश्रूचे गाळू नको
माझ्यासाठी तू गं तिथे ।।
साहेल मी दुःख विरहाचे
येणार नाही तुझ्या भावी जीवनी ।
उतरवेल सखे प्रेमाची गाथा
नित्य माझ्या गं कवनी ।।
