सरणावर माझ्या.....
सरणावर माझ्या.....
सरणावर माझ्या सखे
एक फुल ठेवशील का? ।
आठवणीत माझ्या तू गं
दोन थेंब गाळशील का? ।।
रडलो तुझ्या विरहात खूप
आता दुःख मज हे पचवायचे ।
आयुष्याच्या अस्तापर्यंत आता
सर्वांना आहे गं हसवायचे ।।
असेल तुझी मजबुरी
आहे मज हे गं मान्य ।
तू आहेस गर्भश्रीमंत अन
मी आहे ना गं सर्वसामान्य ।।
तुझ्या गालावरची खळी
आजही माझ्या नयनी दिसते ।
माझ्या अंतरी फक्त सखे
नित्य तुझी छवी वसते ।।
असशील जिथे तू सुखाने रहा
पण प्रेम माझं विसरू नको ।
पाठवलेल्या फुलांना तू गं
रागावूनी कुस्करु नको ।।
करशील लग्न परक्याशी
तर करून घेशील खुशाल ।
पण माझ्या अंतरीच्या प्रेमाची
विझवून टाक आधी ही मशाल ।।
