Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Others

2  

Ajay Chavhan

Others

पिरती.....

पिरती.....

1 min
222


पिरतीच्या मांगं मांगं लागून

आता लोक काई मियालं नाई ।

पिरेम करतो तिच्यावर मी

पण तिले मातर कयालं नाई ।।

जिथं जिथं जाये ती

सायकल माह्यी तिकळेच जाये ।

पाह्यलं तिने माह्याकळं तं

सायकल तिथून कल्टी खाये ।।

दुधावाणी पांढरीफटक

दिसाले व्हती लैच खास ।

पाह्यलं तिले समोर हुबी तं

बोलावं वाटे तासनतास ।।

पोरगी हाये की परी

ती लैच हाये ना गोरी ।

कवा काजून तिनं माह्या

कायिज केलं चोरी ।।

पाह्यलंच नाई कोण्या पोरीचं

रूप एवढं चांगलं ।

म्हणून तं माह्य हिर्दय

तिच्या मांगच लागलं ।।

पण तिले नाई वाट्टे ब्वा

खरंच पिरेम माह्यावर ।

भलतेच माह्ये मित्र मले

उळवत बसते वाऱ्यावर ।।


Rate this content
Log in