STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance Others

4  

Ajay Chavhan

Romance Others

मन झुरतंय गं...

मन झुरतंय गं...

1 min
397

नित्य तुला तिन्ही प्रहरी

मन हे वेडे स्मरतंय गं ।

पाहण्या तुला डोळे भरून

बघ ना किती झुरतंय गं ।।

साहवेना तुझा विरह याला

आतल्या आतच घुटमळतो ।

बोलण्या तुझ्याशी सखे गं

हा रात्रंदिवस तळमळतो ।।

मासा न राही पाण्यावाचून

मलाही करमेना तुझ्यावाचून ।

पाठविले मी भरपूर पत्रे तुला

एकतरी सखे घे ना वाचून ।।

समजून घे गं माझी व्यथा

का मला तू तडपवतेस? ।

सांग एकदाचे राणी बनून

घरी माझ्या तू कधी येतेस? ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance