विषय:- रंग प्रेमाचा
विषय:- रंग प्रेमाचा
पाहिलाय का कधी कुणी
रंग प्रेमाचा कसा आजवर ?|
आज काल ज्याला त्याला
जडतोय खरा प्रेमाचा ज्वर | |
प्रेमा तुझा रंग कसा पाहतो
जो त्याला दिसे त्या तसा |
गर्दीत माणसाच्या खरा रंगच
प्रेमाचा पडला फिका जरासा | |
प्रेम असते गहिरे सागराहून खोल
विस्तीर्ण ते आकाशाहून महान |
प्रेमाला नसे मर्यादा जाती धर्माची
नसतं वय मोठा असो की लहान | | ३| |
प्रेम रंग रुप गंध रस अशा विविध
सौंदर्याने असतं खरं नटलेलं |
तरी प्रेम हे प्रेमच प्राणिमात्रांसवे
माणसांच्याही गरजेचे म्हटलेलं | |४| |