STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance

3  

Author Sangieta Devkar

Romance

व्यसन

व्यसन

1 min
198

कोणाला कशाचे तर मला तुझ्या आठवणीचे व्यसन.

मनात उठणाऱ्या वादळाच, तुझ्या प्रेमाच्या वचनाच,

व्यसन लागले आहे मला वेड्या तुझ्या गहिऱ्या डोळ्याच.

खोल माझ्या हृदयाचे ठाव घेणारे, निरागस तुझ्या हास्याच.

व्यसन मला फक्त तुझ्या हळुवार स्पर्शाच.

मोहून टाकणाऱ्या तुझ्या आपुलकीच,

व्यसन जडलंय मला तुझ्या श्वासाच.

तुझ्यात मला समावणाऱ्या बेधुंद तुझ्या मिठीचं.

व्यसन मला तुझ्या बोलण्याचं,

बोलला नाहीस तरी ऐकण्याचं.

व्यसन तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणाच.

तू जवळ नसलास तरी जवळ अनुभवन्याचं.

व्यसनच लागले आहे तुझे,अवतीभवती तू असण्याचं.

व्यसनच बनायचं आहे माझच मला,

तुझी होण्यासाठी धडपडण्याचं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance