मी फक्त तुझा....!
मी फक्त तुझा....!
माहित असतं मला
तुझ खोट खोट रुसन
मी ही मग चोरून पाहतो
तुझं गालात हसन
लोकांच काय
काहिही बोलतात
पण खरं सांगतो तुझ्यासोबत
गप्पा माझ्या रंगतात
तुझा अबोला म्हणजे
माझं तुझ्या जवळ येण
हळूच मिठीत घेऊन तुला
कानात काहीतरी बोलन
तुझं नेहमीच हसन
हा माझा श्वास आहे
मनात संशय कधी आणू नकोस
मी फक्त तुझा आणि तुझाच आहे

