आला श्रावण ...
आला श्रावण ...
चिंब भिजला आसमंत सारा
आला श्रावण ,बरसल्या धारा ll धृ ll
सांज सुगंधी न्हाली परसात
मादक चाफा धुंद बरसात
गंध प्राशून वाहणारा वारा
आला श्रावण बरसल्या धारा...१
हिरवा ऋतू छेडतो मनाला
थेंब टपोरे स्पर्शती तनाला
खुलली खळी ओंजळीत गारा
आला श्रावण बरसल्या धारा...२
गीत मायेचे आठवांचे सुर
प्रेम हर्षात नाचला मयूर
श्रावण मासी फुलवी पिसारा
आला श्रावण बरसल्या धारा...३
