संध्याराणी.....
संध्याराणी.....
सजलीय संध्या राणी
गंध घेऊन फुलांचा
गाली खुलवितो रंग
गुलाबाच्या पाकळ्यांचा
स्वर तुझे रेशमाचे
चांदण्यात मोहरले
मनातल्या मनी गाणे
नकळत गुंतू लागे
सजलीय संध्या राणी
क्षितिजात वाहे वारा
सावलीत चमकला
नभी दिसे शुक्र तारा
चकाकते रूप तुझे
इंद्रधनू घेई रंग
निशिगंध राणी फुले
मन होई मंद धुंद

