भिजलेली कळी......!
भिजलेली कळी......!
चिंब भिजलेली कळी
पहाटेस ती उमलली
दाटून गुलाबी रंग नवा
सुवास भरूनी वाहीली
उरात गंध दाटला
पाहून त्या फुलाला
किती नाजूक त्या पाकळया
काटयांत सुरेख जन्म घेतला
पावसाने ही भिजविले
त्या नाचणा-या फुलास
झोत हवेची येतां क्षणी
ते डुलते आनंदात
कोमेजुन जाईल उद्या ते
मग होईल का उदास
मी कशी आज मग तोडू
त्या बाव-या फुलास

