STORYMIRROR

सानिका कदम

Others

3  

सानिका कदम

Others

साथ देईन मी.....

साथ देईन मी.....

1 min
226

साथ देईन मी

सदैव तुजला

नको जाऊस तू

सोडून मजला


हाती हात घेत

फिरू चांदण्यांत

हरवून जाऊ

दोघंही प्रेमांत


तुझ्या आठवांचे

गीत मी रचले

शब्द तुझे सारे 

मनांत साचले


आसवे डोळ्यांत 

दाटून येती रे

तुला आठवत 

ओघळून जाती रे


Rate this content
Log in