आजच्या या पावसात...
आजच्या या पावसात...
आजच्या या पावसात
खरंच तुला भेटावंसं वाटतं,
तुला सोबत घेऊन
चिंब-चिंब भिजावंसं वाटतं.
तुला हसताना पाहून
तुझ्याकडे बघत राहावंसं वाटतं
तुझा हात हातात घेऊन
हिरव्यागार रानात फिरावंसं वाटतं
तुझ्या-माझ्या भेटीचं
गीत रचावंसं वाटतं
तुझ्यासोबत गाण्यात
स्वतःला हरवून जावं वाटतं
काळोख करून दाटून आलेल्या पावसात
तुझ्या मिठीत झुलावंसं वाटतं
डोळे बंद करून तिथेच
थांबावंसं वाटतं....
तुझ्यासोबत रमलेल्या या
क्षणाला जपून ठेवावंसं वाटतं...
उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांत
पुन्हा एकदा जगावंसं वाटतं...

