दिलबरा प्रीया"
दिलबरा प्रीया"
धुंद मकरंद ही प्यायली राजसा
गुंतले मी जरी आज प्रेमा तुझ्या
येतसे स्वप्न तुझे सख्या सोहना
त्वरीत धाव माझ्या दिलबरा प्रीया ....
सांगू कशी कोणा कशी
येवू कशी मी तुला भेटायला
प्रेमकरुनी फसले अशी मी,
तुझ्या मनी मी सजले जणू
छमछम करीते पाई ध्वनी
शृंगार केलाय मनंह्रदयी,दिलबर प्रीया ....
सतावू नको आता फार मला
कैसे फुलावर फिरती भ्रमरी
प्रेमात न्हाऊनी झुलेन मी
धूक्यात परीमळ शोधीन, दिलबर प्रीया ....
मनात अलगद येवून बसला
करीते नाना खोड्या सख्या
झालास असा तू वेडा बावरा
मी तुझी प्रियवंदा, दिलबर प्रीया ....
मीनाक्षी किलावत

