ग़ज़ल- सुखाच्या क्षणाला कधी
ग़ज़ल- सुखाच्या क्षणाला कधी


ग़ज़ल वृत्त- भुजंगप्रयात- सुखाच्या क्षणाला
ग़ज़ल
सुखाच्या क्षणाला कधी भाळलेले
रमाया नसे मज झरे भेटलेले...
नदी वाहण्याने तटे साफ झाली
इथे सागराने तिला व्यापलेले....
इथे सूर्य येतो तळपतो उन्हाळा
तिथे वाहणारे झरे थांबलेले....
कसे काय पाहू जगातील वारे
इथे दाट कोडे किती साठलेले....
कशी भंगलेली मनाची कवाडे
सजा भोगती श्वास हेलावलेले....
किती वार झाली कसे सावरावे
कसे हाल माझे इथे कावलेले....
हसावे कसे अन कसे मी रडावे
ना मला कधीही ॠणी भेटलेले....
नभी चांदण्यांनी घरे बांधली ही
धरेवर चिता रोज ही पेटलेले....
विसंबू कुणावर असे कोण माझे
नशीबात माझ्या मळभ दाटलेले....
©मीनाक्षी किलावत (अनुभूति)