STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

दागिना (लावणी)

दागिना (लावणी)

1 min
3

 राया माझ्या जन्मदिना

आज द्या हो नजराना

करू नका हो विचार

काढा नगदी दिनार..

मी आहे तुमची गुले गुलजार

घाला मला दागिना पुतळी हार.. ॥धृ॥

माझ्या नाकात नथनी 

दिसे बांगड्या शोभुनी

श्रुंगारात मी नटली

म्होर तुमच्या बसली..

नाजूक वर्काच्या मिठाईचा बार

घाला मला दागिना पुतळी हार.. ॥१॥

पायी वाजती पैंजण 

मनी भरले चांदण

चांदी जोडव्याची जोडी 

करी अंगागांत खोडी ..

तुमचे नयन करी हो बेजार

घाला मला दागिना पुतळी हार.. ॥२॥

मन माझे आज धूंद 

करी चाळे बाजूबंद

चमकली मुखावली

जशी रूपाने माखली...

माझ्या माथ्यावर शोभे चंद्रकोर 

घाला मला दागिना पुतळी हार.. ॥३॥


Rate this content
Log in