सहवास
सहवास
किती वाटे हवाहवासा
सहवास तुझा
दिवसा अन् रात्रीही
होतो आभास तुझा
सहवासातील आठवणी तूझ्या
जराही विसावत नाही
मी कधी वर्गातही असेल
हे ही त्यांना समजत नाही
छोटयाशा सहवासात तुझ्या
क्षण सूखाचे जगले मी
जीवनात तुझ्या श्रावणसरीच्या
पावसात भिजले मी
सहवास तुझा मंतरलेला
माझे मन हरवितो
पून्हा मिळावा सहवास
हेच मागणे मागतो

