STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Inspirational

4  

Kalpana Nimbokar

Inspirational

मी आणि माझे स्वयंपाकघर

मी आणि माझे स्वयंपाकघर

1 min
553

कोरोनाचा जगभर

असेल जरी कहर

पण या सुट्टयांत आला

माझ्या स्वयंपाकघरात बहर


रोज रोज नवे पदार्थ

पदार्थाची नाही वाण

मुलंही म्हणतात रोज रोज

मम्मी माझी छान


घातले उडीद तांदुळ भिजू

करायला घेतली इडली

त्याबरोबर सांबर रस्सेदार

अन् खोबर्‍या शेंगदाण्याची चटणी


म्हणती मुलं तरीही

सोबत हवी स्वीट डीश

बनविला पटकन बदामी शिरा

पूर्ण केली त्यांची विश


हल्ली रोज रोज सर्वांना

नवीन नवीन खाऊ वाटतंय

माझ्याही मनात मग नवीन

पाककलेचं भुत शिरतंय


आता उद्या बनविते श्रीखंडपुरी

तयारी मनात करुन ठेवली

मी आणि माझ्या स्वयंपाकघराला

जणू अन्नपूर्णामाता पावली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational