STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

वेडे मन

वेडे मन

1 min
687

वेडे मन माझे

तुझ्याकडेच धावते

जागेपणीही ही सतत

तुझेच स्वप्न पाहते


भावना मनाची माझ्या

तुझ्या मनी नांदेल का?

प्रेमफुल तारुण्यातील

सांग कधी उमलेल का?


भोळया माझ्या भावना

भोळेच हे विचार माझे

अवचित गेले गुंतून

तुझ्यात हे मन माझे


साहित्याला गुण द्या
लॉग इन