गुढी उभारु बचावाची
गुढी उभारु बचावाची
1 min
508
चैत्राचा सण आला
गुढी उभारु चैतन्याची
संचारबंदीस करु साह्य
साखळी बनवु माणुसकिची
सजवुन निंबफुलांची गुढी
औषधीचे जणु करु शिंपण
स्वच्छता राखुण ठिकठिकाणी
करु नववर्ष गुढीचे औक्षण
शासनाच्या आदेशाची
अंमलबजावणी करु शिस्तीची
एकमेकांच्या बचावाची
गुढी उभारु मानवतेची
गुढी उभारुनच होते
आपले स्वागत नववर्षाचे
कोरोनाचे संकट जगावर
धोरण अवलंबु बचावाचे
सुरक्षित घरातच आपण
यावर्षीचे आहे गाण
कोरोनावर मात करुन
समृद्ध आयुष्य जगू छान
