अशी जन्मते कविता
अशी जन्मते कविता
1 min
710
करु मंथन विचार
तरंगत येते मनी
खळबळ काळजात
उमलते शब्दातुनी
प्रसवते ती अशीही
होतो भावना उद्रेक
विचाराचा गोतावळा
येतो बाहेर एकेक
कधी करिते विद्रोह
कधी सांडतो जिव्हाळा
लाव रोप भावनाचे
बहरतो काव्यमळा
अशी माझी ती लाडकी
लहरते जनलोका
समजुन घेण्याचा ती
ठेवी जनापुढे हेका
अचानक तिचे असे
आगमन मनी होते
सृजनाचा सोहळा तो
मम अंगणी होते
तिचे जन्मणे माझ्यात
मोहरते बाईपण
तिच माझ्या हदयातील
जागविते आईपण
