STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

3  

Kalpana Nimbokar

Others

मन वेडे पाखरु

मन वेडे पाखरु

1 min
248

मन हे वेडे पाखरु

मागे तुझी वेडी प्रीत

भिती वाटे या जगाची

अन येई आड रित


जेथे गाणे पक्षी गाई

तेथे मना ठाव आहे

जीवनाच्या सागरात

थांबलेली नाव आहे


कधी काळी या मनाला

लागलेला घाव आहे

माझ्या वेडया पाखराची

तुझ्याकडे धाव आहे


मन हे वेडे पाखरु

उंच उडे गगनात

काही होता विपरीत

कोमेजते अंगणात


मन हे वेडे पाखरु

गाई नित्य नवे गाण

जाई तुडवित वेगे

भावनाचे गर्दरान


साहित्याला गुण द्या
लॉग इन