चिमणी पाखरं
चिमणी पाखरं
भेट दिली बालआश्रमास
वाढदिवस करण्या मुलांचा
खळबळ माजली मनातुन
काय दोष चिमणीपाखरांचा
भाव होते अगदी निरागस
छोटया बालकांच्या चेहर्यावर
आई बापा विना वाढती पोरं
केविलवाणी दशा जीवनपटावर
कुठे हरवले कसे हरवले
बालपण या चिमण्यांचे
अनाथ म्हणून जगी मिरवणे
अपयश हे आपल्या समाजाचे
कोणीही येतो मदतीचा हात देतो
मग जिवनाची गत जरा सुधारे
नियतीच्या कृर खेळात
कशी अनाथ झाली चिमणी पाखरे
कोण भविष्य सावरणार आता
हया चिमणी पाखरांचे
अस्वस्थ मला सवाल करुन गेले
अनाथ जगणे या मुलांचे
