स्मितहास्य
स्मितहास्य
भेटलो स्पर्धेत एका
अनुभव बक्षीस घेण्याचा
तुच होता संचालनास
क्षण एक नजर होण्याचा
पाहताच तुझ्याकडे मी
स्मितहास्य केलेस तू
एका नजरेत तुझ्या मनाचे
दान मला दिलेस तू
घोळक्यात जरी असलो
एकमेकांना शोधत होतो
गहीरा कटाक्ष एका क्षणी
स्मितहास्याने टाकीत होतो
कशी फसले मी सख्या रे
तुझ्या एका स्मितहास्यावर
गूंतत गेलो एकमेकांत
अवचित मिठीत आल्यावर
आजही स्मित हास्यच करतो
मॅसेज माझे पाहील्यावर
तु हीअस्वस्थ होतच असशील
आठवण माझी आल्यावर
कळते तुला प्रेम माझे
पण तू खोलत नाही भावना
वाचुन माझ्या गुज मनीचे
स्मित करी तुझ्या संवेदना