गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे
मन पालवी बहरून येता,
प्रीत भावना अलगद फूलता,
चाल अचानक बदलून जाता,
जेव्हा हे हृदय गुंतता !!
माळरानी मन फिरता-फिरता,
बाग प्रीतीची फुलता फुलता,
सुगंध नवा मग येई हाता,
जेव्हा हे हृदय गुंतता. !!
कोकीळ रव ही आलाप घेता,
मन पाखरू भिर भिर करता,
सूर अंतरीचा मिळून जाता,
जेव्हा हे हृदय गुंतता. !!
जागेपणीही स्वप्न तरळता,
झोपेत अचानक दचकून उठता,
स्वर्गसुखाचा येता हाता,
जेव्हा हे हृदय गुंतता.!!
अविरत वाहणे सुरू राहता,
ओढ कशाची अंतरी मिळता,
लाटेला हा किनारा मिळता,
जेव्हा हे हृदय गुंतता !!
दाटूनी येता ही निरसता,
ध्यास जडे हा अंतरी चित्ता,
स्व अस्तित्वाचा विसरही पडता,
जेव्हा हे हृदय गुंतता !!
मोहवणारे हे क्षणही जपता,
ती मनाची समरसता,
खुदकन गाली हसू पसरता,
जेव्हा हे हृदय गुंतता !!
तेव्हा मी माझ्यात हरवता,
ओळख जुनी पण नव्याने होता,
मळभ मनाचे दूरही होता,
जेव्हा हे हृदय गुंतता !!
तिमिराची ही वाट संपता,
तेज अचानक जवळी येता,
निराळे हे वळण लागता,
जेव्हा हे हृदय गुंतता. !!
हाक अंतरी ची साद घालता,
हृदय हृदयाशी एकरूप होता,
उरते कुठे मग ही अलिप्तता,
जेव्हा हे हृदय गुंतता !!