STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

2  

Seema Kulkarni

Abstract

आत्ता कुठे उमजू लागलं होतं

आत्ता कुठे उमजू लागलं होतं

1 min
72

आत्ता कुठे उमजू लागलं होतं, मन हे वेड गुंतू लागलं होतं

समजून आलेल्या भावनांना ,शब्दात व्यक्त करू पाहात होत.


 कळी आत्ता तर खुलली होती, सुगंध पसरू पाहत होती,

पण पसरताना सुगंध मात्र, उगाचच हलकी मिटत होती.


वळण मार्गावरचं, अशातच तर, ओळखीचं वाटत होतं,

जपताना ओळखीला त्या, ते थांबण मात्र अकल्पित होत.


 व्यवहारात दुनियादारीच्या, वागणं मात्र सहजच होतं

पण न्याहाळताना ती दुनिया, पावलांचं अडखळणं मात्र नेहमीच होतं.


आत्ता तर कुठे स्पंदने मनाची, हृदयाचा गाभारा उजळत होतं,

पण उजळताना गाभारा, पणतीच तेवणं मात्र बाकी होतं.


 कॅनव्हासवर आयुष्याच्या, आत्ता तर कुठे चित्र साकारत होतं,

साकारताना ते चित्र मात्र , फक्त रेषांच जुळणं बाकी होतं.


धडपडताना ,सावरताना, स्वतःचं विश्‍व उभारलं जात होतं,

पण विश्वाच्या त्या पसार्‍यात, अंदाजाच गणित मात्र चुकत होतं.


तरंगात त्या भावविश्वाच्या, इंद्रधनूच खुलणं होतं

पण मिसळलेल्या रंगांचं, आभाळ मात्र वेगळंच होतं


विहरताना आकाशात, पंखांचा फडफडणे सुरुच होतं,

पण ठेच अडथळ्यांची , अनुभव नवाच शिकवत होतं


आत्ता तर कुठे, परिभाषेत आनंदाच्या ,मन अडकत होतं

पण परीभाषेलाही सीमा असते, हे अनुभवाने कळलं होतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract