STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

माझ्या मराठीच लेणं

माझ्या मराठीच लेणं

1 min
224

माझ्या मराठीचा मला 

असे सार्थ अभिमान

 अलंकार शृंगाराने

 सजे सौंदर्याचा मान १.


ओघवती लवचिक 

अग्रेसर साहित्याची

 ग्रंथसंपदा विपुल 

खाण शोभते गुणांची. २.


मोह पडला साऱ्यांना

पसायदान गीतेचा

सुभाषित संस्कृताचे

मान गायत्री मंत्राचा. ३.


रूपसुंदर साजिरं

गाजे डंका त्रिभुवनी

माझ्या मराठीचे लेणं 

असे अद्भुत जीवनी. ३.


राजभाषा ती राज्याची

मान सर्वत्र मिळतो

जागवीता मराठीला

रंग खुशीचा चढतो. ५.


पांघरुनी सदोदित

शाल मराठी भाषेची

उब मिळते सतत

त्या शब्दांच्या गोडव्याची ६.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract